जिला

स्वच्छता ही सेवा आणि स्वच्छ सेवा संकल्प अभियानाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नांदेड, २२- स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा आणि स्वच्छ सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध गावांमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे.

या अभियानांतर्गत गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, परिसर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेसोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असून, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात येत आहे.

या मोहिमेत महिला बचतगटांच्या सदस्यांसह युवक, विद्यार्थी, शिक्षक, पालक, पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामूहिक सहभागातून गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, यासाठी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांना प्रेरित करण्यात येत आहे.

स्वच्छता ही केवळ एका अभियानापुरती मर्यादित न राहता ती गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा आणि सामूहिक जबाबदारीचा भाग बनावी, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी गावांची निर्मिती करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *