जिला
लोहा तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची सोडत
लोहा : तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज उपविभागीय अधिकारी विलास नरवडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच संबंधित गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या सोडतीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. छाया : विनोद महाबळे



