मराठवाडा

आज ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

 

थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य समुपदेशन यांना अधिक व्यापक स्वरूप देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

नागरिक, विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये थॅलेसेमियाबाबत आवश्यक माहिती पोहोचविणे, विवाहपूर्व तपासणी व समुपदेशनाला प्रोत्साहन देणे, एचपीएलसी/इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी, रक्तदान शिबिरे आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

थॅलेसेमियाचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगांवकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक चेतन भोजकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व मंडळांचे उपसंचालक सहभागी झाले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *