क्राईम

बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोरटा जेरबंद; ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

देगलूर : नांदेड जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत देगलूर पोलिसांनी एका संशयिताला बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, या वाहनांची अंदाजे किंमत ४ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार वाहन चोरीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी देगलूर गुन्हेशोध पथकाकडून विशेष कारवाई सुरू आहे. दरम्यान, चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी खानापूर फाटा परिसरात काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून देगलूर पोलिसांनी खानापूर फाटा येथे सापळा रचला.

पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून पाठविले. रात्रीच्या सुमारास वन्नाळी रोडच्या दिशेने दोन इसम चोरीच्या मोटारसायकलीच्या खरेदी-विक्रीबाबत चर्चा करीत असताना पोलिसांनी अचानक घेराव घातला. यावेळी एक इसम अंधाराचा फायदा घेत पसार झाला; मात्र दुसऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने चोरीच्या मोटारसायकली विविध ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन एकूण १० मोटारसायकली जप्त केल्या. पोलीस अभिलेखांची पडताळणी केली असता त्यापैकी एक मोटारसायकल देगलूर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४८७/२०२६, कलम ३०३(२) BNS अंतर्गत तसेच एक मोटारसायकल कंधार पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३७३/२०२६, कलम ३०३(२) BNS अंतर्गत चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची एकूण अंदाजे किंमत ४ लाख १० हजार रुपये आहे. प्रकरणाचा पुढील तपास देगलूर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव, तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. देगलूरचे प्रभारी अधिकारी वैभव पडवळ, पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे आणि त्यांच्या पथकातील अशोक घुमे, नामदेव शिरोळे व ओमप्रकाश डिडेवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

चोरीचे वाहन खरेदी न करण्याचे पोलिसांचे आवाहन

कमी किमतीत वाहन मिळत असल्याने त्याची कागदपत्रे, मालकी हक्क आणि कायदेशीर स्थितीची पडताळणी न करता वाहन खरेदी करू नये. चोरीच्या वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सहभागी झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. परिसरात संशयास्पद वाहनांची खरेदी-विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *