उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेड च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षवेधी रिकामे ताट वाटी तांब्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद.

पदयात्रा डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आणि पेन्शनर्स असोसिएशन , ईपीएस 95 असोसिएशन आणि इतर अनेक संघटनांच्या एकत्रित सहाय्याने निघालेल्या या आगळ्यावेगळ्या, जगावेगळ्या रिकामे ताट वाटी तांब्या मुक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद दिसून आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकांचे समय सूचित मार्गदर्शन झाले. डॉक्टर हंसराज वैद्य यांनी शासनास विनंती केली की महाराष्ट्र शासन एक पुरोगामी शासन आहे. अखंड भारतात एक राष्ट्र एक संविधान समता समानता असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना दुजाभाव केला जातो इतर राज्याप्रमाणे मानधन दिले जात नाही साठ वर्षे मानले जात नाही 2007 चा कायदा 2010 चे नियम 2011 व 13 चा कायदा आणि 2019 चा सुधारित कायदा इथे तंतोतंत जर अमलात आणले तर ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रश्न सहज सुटले जातील.
पण शासन ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाकडे सहानुभूतीने विचार करत नाही ही फार मोठी भूल करत आहे. शासनाने त्वरित लाडके मायबाप योजना आणावी आणि त्या अंतर्गत या दुष्काळामुळे होरपळत असलेल्या गरीब गरजवंतांना त्वरित सहाय्य करावे कारण यात आज असल्या तळत्या उन्हात रस्त्यावर उतरलेली सर्व मंडळी पात्र मंडळी आहेत पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून यांना त्वरित शासनाने लाडके मायबाप योजनेअंतर्गत प्रतिमा 5000 रुपये मानधन त्वरित द्यावे आणखीन एक महिना अवधी सगळ्यांच्या वतीने
देण्यात आले आज आम्ही जेष्ठ नागरिक दिवस साजरा करू शकलो नाही कारण पोटात अग्नी भडकलेला आहे आमचे ताट वाटी आणि तांब्या रिकामा आहे आमची मनस्थिती जेष्ठ नागरिक दिवस मानायची नाही ही अवस्था शासनाने डोळे उघडून पाहावे आणि त्वरित आम्हाला न्याय द्यावा आम्ही भीक मागत नाही जेष्ठत्व हा गुन्हा नाही ती संवैधानिक नैसर्गिक बाब आहे याचं शासनाने भान ठेवावं आणि त्वरित न्याय द्यावा ही नम्र विनंती करण्यात आली. येत्या 30 दिवसात शासनाने निर्णय नाही घेतला तर आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्न पाणी त्या वाचून दुसरा कुठलाही उपाय नाही हे ठणकावून सांगण्यात आले आणि उपस्थित प्रतीकात्मक अन्य पाणी त्या करणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तळपत्या उन्हात सुद्धा हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर.
हजारो गरीब गरजवंताचे नागरिकांनी रिकामे ताट वाटी तांब्याचा गजर करीत शासनाला जागे संदेश.
आम्ही विस्थापित, निराधार निराश्रित गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा परितक्त्या माता तथा दिव्यांग तळपत्या उन्हात उपाशीपोटी आणि रिकाम्या ताट वाटी तांब्या घेऊन रस्त्यावर उतरले असताना आणि अन्न पाणी त्या करत असताना एसी मध्ये बसून लहानाचे मोठे झालेल्यांच्या सत्कार शासनाला करावा तरी कसा वाटत असेल.
महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना त्यातल्या त्यात मराठवाडा आणि त्यात नांदेड दुष्काळामुळे होरपळून निघत असताना, शेतकरी पुरता नागवा झाला असताना, गरीबगरांच्या हातांना काम नाही म्हणून दाम ही नाही अशा अवस्थेत काही सुख-लोलूप ज्येष्ठ नागरिकांनी शासनाचा सत्कार स्वीकारला हे अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आणि शासनाने त्यांचा सत्कार करून त्यांना काजू बदाम किसमिस चहा बिस्किट व मिष्टान्न खाऊ घालून हार तुरे देऊन पोळ्या सारखा एक दिवसासाठी जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला हे जगातले कितना कितवा आश्चर्य असेल.
प्रतीकात्मक अन्न पाणी त्याग आंदोलनास बसलेल्या हजारो जेष्ठ नागरिकांनी रिकामे ताट वाटी तांब्या वाजून सत्कार करून घेणाऱ्यांचा व सत्कार करणाऱ्यांचा ही धिक्कार केला
शासनाला आणखीन एक महिन्याचा अवधी देऊन ठणकावून सांगण्यात आले की तुम्ही सहानुभूतीपूर्वक ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आंदोलन करते पुढच्या 30 दिवसानंतर आम्ही जिलाधिकारी कार्यालय समोर आमरण अन्न पाणी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असल्याचे सर्वांनी ताट वाटी तांब्या वाजवत आणि हात वर करून सांगितले.



