मराठवाडा

परभणीतून माय-लेकी बेपत्ता : माहिती असल्यास नानलपेठ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

 

परभणी, दि. 6 : परभणी शहरातील इंदिरा नगर येथील परविन जाविद शेख (40 वर्षे) आणि त्यांची मुलगी सना जाविद शेख (14 वर्षे) या दोघी गुरुवार (दि. 1) रोजी दुपारी सुमारे 2 वाजता शासकीय रुग्णालय, परभणी येथील वार्ड क्रमांक 4 परिसरातून बेपत्ता झाल्या असून, याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरील बेपत्ता महिला ही 40 वर्षीय असून, परविन जाविद शेख आहे. त्यांची उंची सुमारे 5 फूट असून, रंग गोरा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ व चेहरा गोल आहे. त्यांनी साडी परिधान केलेली असून त्यावर बुरखा व ओढणी असल्याचे वर्णन आहे. त्यांच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल असून त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड आहे.

बेपत्ता मुलगी सना जाविद शेख ही 13 वर्षे 10 महिने असून, उंची सुमारे 5 फूट आहे. तिचा रंग गोरा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ व चेहरा गोल आहे. तिने ड्रेस परिधान केलेला असून त्यावर बुरखा व ओढणी परिधान केली आहे. सदरील महिला व मुलगी यांच्याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास अथवा त्या कुठे आढळून आल्यास त्यांनी नानलपेठ पोलीस ठाणे ०२४५२-२२०४५०, पोलीस निरीक्षक गोबाडे ८८०५९५७४०० आणि पोहेकॉ/५२ एस.एस. मुरकुटे ८७६६८८१६८२ तात्काळ नानलपेठ पोलीस ठाणे, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *