नांदेड विभागाच्या 2 दिवसीय सघन तिकीट तपासणी मोहिमेत 1,281 प्रकरणे निदर्शनास

63 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा सहभाग; 50 गाड्यांची तपासणी; 11.15 लाखांचा महसूल प्राप्त
अधिकृत तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास देण्यासाठी रेल्वेची कटिबद्धता
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने अधिकृत तिकीटधारक प्रवाशांना शिस्तबद्ध, सुरक्षित, आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने दिनांक 22.10.2026 आणि 23.10.2026 रोजी सलग 2 दिवस सघन तिकीट तपासणी मोहीम (Massive Ticket Checking Drive) राबविली.
या 2 दिवसीय मोहिमेदरम्यान 63 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून एकूण 50 गाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 1,281 प्रकरणे निदर्शनास आली असून त्यातून 11,15,270 इतका महसूल प्राप्त झाला.
नांदेड विभागातील तिकीट तपासणी पथकांच्या सहभागाने ही मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेचे निरीक्षण श्री शैलेश कुमार सिंह, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांनी केले.
तिकीटविना किंवा अनियमित प्रवासाला आळा घालणे, प्रामाणिक प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करणे तसेच आरक्षित आसने, बर्थ आणि इतर प्रवासी सुविधा अधिकृत प्रवाशांसाठी उपलब्ध राहतील याची खात्री करणे, हा या सघन तिकीट तपासणी मोहिमांचा प्रमुख उद्देश आहे.
नांदेड विभाग सर्व प्रवाशांना आवाहन करतो की, प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करावे, आवश्यक अधिकृत प्रवास दस्तऐवज जवळ बाळगावा आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे. तसेच अशा तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
सर्व अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, संरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे. जबाबदार आणि शिस्तबद्ध प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रामाणिक रेल्वे प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नांदेड विभागात अशा सघन तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही सुरू राहतील.



