जिला

सामाजिक कार्याची दखल; सुनील अनंतवार यांची अखिल भारतीय कलवार,कलाल, कलार महासभा, दिल्ली च्या राष्ट्रीय सचिवपदी निवड

 

नांदेड : समाजसेवा, आरोग्यसेवा आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेले सुनील प्रभाकर अनंतवार यांची दिल्ली येथील अखिल भारतीय कलवार कलाल कलर महासभेच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष राय आणि महासचिव किशोर भगत यांनी ही निवड केली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय सल्लागार डॉ. हनमा गौड म्हात्रे, महासभेचे मराठवाडा प्रभारी डॉ. संजय तेलंग आणि बाबाराव देवलवार यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

सुनील अनंतवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, दिव्यांग सेवा आणि समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम राबविले आहेत. समाजातील हजारो बांधवांना कमी खर्चात दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचे वाढदिवस केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी सेवाकार्याची जोड दिली आहे. नेरली येथील कुष्ठधाम वसरणी येथील अंध विद्यालय, मूकबधिर विद्यालय आणि अनाथ आश्रम अशा ठिकाणी वाढदिवस साजरे करून तेथील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, अन्नदान आणि मदतीचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. आनंदाचे क्षण वंचित घटकांसोबत साजरे करण्याचा त्यांचा हा उपक्रम समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारा आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून गरजू नागरिकांना कमी खर्चात चष्मे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला आहे. याशिवाय आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती व जनसेवेचे कार्य केले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने नांदेड महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व वस्त्रांचे वाटप करून त्यांच्या श्रमाचा सन्मान करण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला आहे. समाजातील सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार, उच्चशिक्षित तरुणांचा गौरव आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करून नव्या पिढीला शिक्षण व प्रगतीची प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

मकर संक्रांतीनिमित्त समाजातील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून प्रतिष्ठित महिलांच्या सहभागातून समाजप्रबोधनाचे उपक्रम राबविले जातात. तसेच सरदार सर्वाई पापन्ना गौड जयंती दरवर्षी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सामाजिक व विधायक कार्यक्रम आयोजित करून सामाजिक एकता, बंधुभाव आणि परिवर्तनवादी विचारांना चालना देण्याचे कामही ते करीत आहेत.
20 डिसेंबरला दिल्लीतील अधिवेशनात नियुक्तीपत्र प्रदान होणार

सुनील अनंतवार यांच्या राष्ट्रीय सचिवपदाच्या निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र *20 डिसेंबर रोजी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय कलवार कलाल कलर महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे.* या अधिवेशनात देशभरातील समाजबांधव आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान केले जाणार असल्याने त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

सुनील अनंतवार यांच्या राष्ट्रीय सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील कोंडलवार, उपाध्यक्ष बालाजी अण्णा गोडसे, संजीत कोमटवार, सचिव रमेश पाटील घंटलवार, नांदेड जिल्हा प्रभारी बाबाराव नंदेवार, जिल्हाध्यक्ष अशोक पडलवार, सचिव गंगाधर नंदेवाड, कोषाध्यक्ष शंकर रायपलवार, उपाध्यक्ष गणेश नंदेवार, राजकुमार पडलवार, दत्तात्रय अनंतवार, संतोष मारकवार, सचिव ज्ञानेश्वर इबितवार, पांडुरंग पाटील, बालाजी पाटील सुंदरगिरवार, रवी कन्नलवार, अविनाश घंटलवार यांच्यासह समाजातील विविध पदाधिकारी व समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात, तरुणांना प्रोत्साहन, महिलांना सन्मान, ज्येष्ठांचा गौरव आणि वंचित घटकांना आधार देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे नांदेडसह महाराष्ट्रातील कलवार, कलाल व गौड समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यातून समाजाची उन्नती आणि समाजसेवेतून माणुसकीचा संदेश देणाऱ्या सुनील अनंतवार यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमुळे समाजाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि बळ मिळेल, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *