महाराष्ट्रा

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2026 मध्ये विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षित बर्थ उपलब्ध

सणासुदीच्या काळात विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विविध गंतव्यस्थानांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी नांदेड विभागातून सुटणाऱ्या निवडक विशेष रेल्वेगाड्यांमधील आरक्षित बर्थच्या उपलब्धतेची माहिती जाहीर करण्यात येत आहे.
दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 20:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खालील विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षित बर्थ उपलब्ध आहेत. हजूर साहिब नांदेड ते पानिपत दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07635 मध्ये 27 ऑक्टोबर 2026 रोजीच्या प्रवासासाठी 210 बर्थ उपलब्ध आहेत.

हजूर साहिब नांदेड ते उधना दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07605 मध्ये 26 ऑक्टोबर रोजी 656, 2 नोव्हेंबर रोजी 642, 9 नोव्हेंबर रोजी 592, 16 नोव्हेंबर रोजी 538 आणि 23 नोव्हेंबर 2026 रोजीच्या प्रवासासाठी 608 बर्थ उपलब्ध आहेत. जालना ते येलहांका दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07601 मध्ये 25 ऑक्टोबर 2026 रोजीच्या प्रवासासाठी 237 बर्थ उपलब्ध आहेत.

जालना ते तिरुपती दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07814 मध्ये 29 ऑक्टोबर रोजी 224, 5 नोव्हेंबर रोजी 395, 19 नोव्हेंबर रोजी 278 आणि 26 नोव्हेंबर 2026 रोजीच्या प्रवासासाठी 666 बर्थ उपलब्ध आहेत.
हजूर साहिब नांदेड ते तिरुचानूर दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07603 मध्ये 27 ऑक्टोबर रोजी 548, 3 नोव्हेंबर रोजी 779, 10 नोव्हेंबर रोजी 471, 17 नोव्हेंबर रोजी 698 आणि 24 नोव्हेंबर 2026 रोजीच्या प्रवासासाठी 848 बर्थ उपलब्ध आहेत.
वरील उपलब्धता ही दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 20:00 वाजताची स्थिती आहे. प्रवाशांकडून होणाऱ्या आगाऊ आरक्षणानुसार बर्थची उपलब्धता वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे प्रवाशांनी आरक्षण करण्यापूर्वी अद्ययावत उपलब्धता तपासून घ्यावी.

सणासुदीच्या काळात प्रवास अधिक सुलभ आणि नियोजनबद्ध करण्यासाठी प्रवाशांनी विशेष रेल्वेगाड्यांमधील आगाऊ आरक्षण सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *