हेल्थ

नायगाव तालुक्यातील आरोग्य संस्थेचे डॉ अमृत चव्हाण जिल्हा पर्यवेक्षकीय पथकाने केली पाहणी 

 

नायगाव :- प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे मूल्यांकन व सनियंत्रण करण्याच्या अनुषंगाने आज दि १९ ऑक्टोबर रोजी मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार, तत्पर आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. सर्व सामान्य नागरिकांना मोफत मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी मा. मुख्यमंत्री व मा.आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राची परिवेक्षीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात सविस्तर पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले सर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश पाटील सर,मा. उप संचालक आरोग्य सेवा लातूर डॉ सतिशकुमार सोलंके सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिवेक्षकीय अधिकारी तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ अमृत चव्हाण, नायगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीकांत पटवेकर आणि आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी नायगाव तालुक्यातील बरबडा, कुंटूर व मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन प्रा.आ.केंद्राच्या विविध कामकाजाची पाहणी केली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व बाबींची चेकलिस्टनुसार सखोल व परिपूर्ण तपासणी करण्यात आली. आरोग्य सेवा, अभिलेख, उपलब्ध सुविधा, विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली .

या भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बरबडा डॉ गणेश जाधव, मांजरम डॉ. प्रदुमन पाटील, अंकुश खिल्लारे, संगेवार, भास्कर ढेरे, संतोष साखरे, चव्हाण, शुभम येरमवार, शैलेश मच्छरलावार, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, एलएचवी, जीएनम, एएनएम, लिपिक, शिपाई तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

जिल्हा परिवेक्षकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिले व मार्गदर्शन केले .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *