महाराष्ट्रा

चक्रीवादळ अर्नबच्या पार्श्वभूमीवर 2 रेल्वेगाड्यांच्या सेवेत बदल,

संबलपुर एक्स्प्रेस रद्द, तर नरसापूर एक्स्प्रेस अंशतः रद्द

चक्रीवादळ अर्नबच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वेगाड्यांच्या सेवेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नांदेड विभागातून धावणाऱ्या खालील 2 रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.

1. गाडी क्रमांक 20810 – हजूर साहिब नांदेड–संबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द :
गाडी क्रमांक 20810 हजूर साहिब नांदेड–संबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक 27.10.2026 रोजीची सेवा रद्द करण्यात आली आहे.
या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडी रद्द झाल्याची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

2. गाडी क्रमांक 12788 – नगरसुल–नरसापूर एक्सप्रेस अंशतः रद्द :
गाडी क्रमांक 12788 नगरसुल–नरसापूर एक्सप्रेस, दिनांक 27.10.2026 रोजीची सेवा चार्लापल्ली–नरसापूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. हि गाडी नगरसूल ते चार्लापल्ली अशी धावेल.
त्यामुळे सदर गाडी चार्लापल्ली ते नरसापूर या मार्गावर धावणार नाही.

प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती रेल्वेच्या अधिकृत चौकशी माध्यमांद्वारे तपासून प्रवासाचे नियोजन करावे.
चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षितता व सोय लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाकडून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *