महाराष्ट्रा
नांदेड–उधना विशेष रेल्वेगाड्या रद्द

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे हजूर साहिब नांदेड–उधना दरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या गाड्यांना कमी प्रतिसाद मिळत असल्याने खालील विशेष रेल्वेगाड्यांच्या उर्वरित फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्र. 07605 हजूर साहिब नांदेड–उधना ह्या विशेष गाडी च्या 02 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2026 दरम्यानच्या एकूण 04 फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत.
गाडी क्र. 07606 उधना–हजूर साहिब नांदेड ह्या विशेष गाडी च्या 03 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2026 दरम्यानच्या एकूण 04 फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत..
प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत करण्यात येत आहे.



