” राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ” चे भोकर येथील शाहू महाराज विद्यालय येथे संपन्न

भोकर :- आज दि. २७ ऑक्टोबर रोजी ” राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिना” निमित्त वय वर्ष १ ते १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे,डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य ), वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ” राष्ट्रीय जंतनाशक मोहीम ” दिनानिमित्त आज श्री शाहू महाराज महाविद्यालय,भोकर येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहीम विषयी मार्गदर्शन करून गोळ्या खाऊ घातले.
यावेळी आरबीएसकेचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांनी महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून सेवन करायला लावले.
यावेळी आरबीएसके पथकचे डॉ. वेंकटेश टाकळकर, डॉ. ज्योती येन्नावार, डॉ.अपर्णा जोशी,औषध निर्माण अधिकारी संदीप ठाकूर, गिरी रावलोड, योगेश पवार आरोग्य सेवक, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुमलवाड, वागतकर सिस्टर, उपस्थित होते..
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखणे व जंत संसर्गापासून संरक्षण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
निरोगी विद्यार्थी, सुदृढ भविष्य.



