स्पोर्ट्स

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत ग्यान माता विद्या विहार शाळा चौथ्या स्थानावर

अतिफोद्दीन सिद्धिकी याची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

 

नांदेड दि. 25 – नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत ग्यान माता विद्या विहार शाळेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करत स्पर्धेचे चतुर्थ स्थान पटकाविले.

पहिल्या सामन्यात नाशिक विभागाचा 3-0 अशा गोल फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य सामन्यात मुंबई विभाग संघाने 1-0 असा पराभव केल्यामुळे ग्यान माता शाळा संघास चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

संघामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने ग्यान माता विद्या विहारचा खेळाडू अतिफोद्दीन फक्रोद्दीन सिद्धिकी याची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली. मध्यप्रदेश येथे होणार्‍या आंतरशालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अतिफोद्दीन हा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी शाळेचे क्रीडाशिक्षक डॉ. विष्णु शिंदे, फेलिक्स पिल्ले, अलेक्स के., सौ. श्वेता ठाकूर, सौ. यदुकृष्णा यांचे मार्गदर्शन लाभले.

मध्यप्रदेश येथे होणार्‍या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य फादर ईग्नाथी, शाळेचे अधीक्षक फादर आनंद, सिस्टर्स, क्रीडाशिक्षक, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेच्या संघाला शुभेच्छा दिला

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *