महाराष्ट्रा

नांदेड सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलगनर साहिब बोर्ड पुर्नस्थापित, महाराष्ट्र शासन निर्णय राजपत्र अधिसूचना जारी केली.

 

महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागातर्फे माननिय मुंबई उच्च न्यायालय (छत्रपति संभाजी नगर/औरंगाबाद खंडपीठ) यांच्या निर्देशांचे पालन करुन नांदेड सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब बोर्डाला त्याच्या मुळ स्थिती मध्ये पुनः बहाल करण्यात आले। या संबंधी राज्य सरकार तर्फे दि. 26 ऑक्टोबर 2026 ला महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण भाग चार-अ) मध्ये अधिकारीक अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन ने नांदेड सिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अधिनियम 1956 चे कलम 6 ची उप कलम (4) व (5) आणि कलम 11 ची उप कलम (1) च्या अंतर्गत दि. 8 मार्च 2019 ची अधिसुचनेच्या आधारे गुरुद्वारा बोर्डाचे गठन करण्यात आले होते व अध्यक्षांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली होती.

साल 2022 च्या कारवाई नंतर राज्य शासनाने दि. 29 जून 2022 ची अधिसूचना (क्र. GUR/2022/C.R. 108/J-7(A) चे अंतर्गत कलम 53 (1) आणि (2) चे अधिकारा अन्वये या बोर्डाला निरस्त करण्यात आले होते तसेच वेळो-वेळी गुरुद्वारा बोर्डाचे कामकाज व संचालन करण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत होती.

माननिय उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय: साल 2002 च्या या शासन निर्णयास आव्हान देणाऱ्या रीट याचीकेवर (क्रमांक 10553/2022) ची सुनावणी करतांना, माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी आपला निर्णय दिला. न्यायालयाने 29 जून 2022 ची सरकारी अधिसूचना रद्द केली आणि राज्य सरकारला मंडळाला त्याच्या मूळ स्थितीत पुर्नस्थापित करण्याचे निर्देश दिले.

शासनाद्वारे पुर्न स्थापना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 8 मार्च 2019 रोजी गठीत झालेल्या मंडळाच्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे उपसचीव श्री भगवान सावंत यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या अधिसूचने नुसार अधिसुचना क्र. RFD28053(53)/2/2026/J7 (A) पुर्नस्थापित करण्यात आले आहे.

या अधिसूचनेच्या अंमलबजावणी मुळे गुरुद्वारा मंडळाचा दर्जा 29 जून 2022 ची अधिसूचना जारी होण्यापूर्वी जसा होता तसाच पुर्नगठीत करण्यात आला आहे. त्यामुळे एका रीतसर गठीत मंडळाद्वारे तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा चे व्यवस्थापन आणि प्रशासनिक कार्ये पुन्हा सुरु करणे शक्य होईल.

ता. 29 जून 2022 च्या वेळेस विद्यामान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची नांवे खालील प्रमाणे आहेत स. भूपिंदर सिंघ जी मिन्हास (अध्यक्ष), स. गुरिंदर सिंघ जी बावा (उपाध्यक्ष), स. रविंदर सिंघ जी बुंगई (सचिव), स. मनप्रीत सिंघ जी कुंजीवाले (सदस्य), स. गुरमीत सिंघ जी महाजन (सदस्य), स. हरपाल सिंघ जी भाटीया, स. गोबिंद सिंघ जी लोंगोवाल (सदस्य), स. परमज्योत सिंघ जी चाहल (सदस्य), स. रघुजीत सिंघ जी विर्क (सदस्य).

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *