शहर
शहरातील पुटपाथवरिल आतिक्रमन पोलीस विभाग व मनपा विशेष पथकाने काढले

नांदेड शहरातील पुटपाथवरिल आतिक्रमनामुळे नागरिक व रहदारीस अडथळा निर्माण होत असुन वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने मा. श्री. शशिकांत महावरकर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्या आदेशाने शहरा मध्ये पोलीस विभाग व नांदेड वाघळा महानगरपालीका यांच्या संयुक्त पथकाने शहरातील अतिक्रमन काढण्यास सुरूवात केली आहे.
• शहरातील होणारी वाहतुकीची कोंडी व नागरिकास होणारा त्रास कमी करण्यासाठी वजीराबाद चौक, पोलीस अधिक्षक कार्यालय ते कलामंदीर पर्यंत दोन्ही बाजुने झालेले पुटपाथवरिल अतिक्रमण आ काढण्यात आले. नागरिकांना अवाहान करण्यात येते की कोणीही पुटपाथ, रोडवर अतिक्रमण करूनये अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल.
सदरची कार्यवाही मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शना खाली मा. श्री. अबिनाशकुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री.सुरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, पोनि अशोक घोरबाड पोनि निकम, पोउपनि आगलावे, जसपासिंघ, नांदेड महानगरपानिकेचे आतिक्रमण विरोध्दी पथक, आरसिपी पथक पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी केली.



