अण्णा मी संघरत्न बोलतोय नांदेड रेल्वे स्टेशन मधून अचानक एक फोन

नांदेड रेल्वे स्टेशन मधून अचानक एक फोन येतो… समोरून अण्णा मी संघरत्न बोलतोय मी माझे अन्य २९ सहकारी अंध व दिव्यांग आहेत. आम्हीं रेल्वेत प्रवाशांना वेफर, कोल्ड्रिंक्स व अल्पोहार विक्री करून उदरनिर्वाह करतो. आज नांदेड गंगानगर एक्सप्रेस मध्ये नित्यनेमाने विक्री करत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी आम्हा गोरगरीब दिव्यांगांचे सर्व साहित्य जप्त करून आम्हाला अन्यायकारक वागणूक दिली.
तुम्हीच या लोकांना धडा शिकवू शकता लवकर नांदेड रेल्वस्थानकात या संघरत्न व माझे संभाषण सुरू असतानाच ड्रायव्हरला गाडी नांदेड रेल्वे स्टेशनच्या दिशेने घेण्यास आदेशित केलें. अवघ्या काही मिनिटांत रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयात सर्व दिव्यांग बांधवांसोबत जाऊन रेल्वे स्टेशन प्रबंधक व अन्य कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले व गोरगरीब दिव्यांग बांधव असोत वा रेल्वेत विक्री करणारे गोरगरीब कष्टकरी महिला वर्ग ते कुणीही असो त्यांना यापुढे त्रास होता कामा नये.
हे सूचित करत जप्त करण्यात आलेल विक्री साहित्य दिव्यांग बांधवांना परत मिळवून दिले. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांना दिलेले अधिकार अबाधित राहिले पाहिजेत याची काळजी प्रशासनातील सर्वांनी घ्यावी.
(मोहनराव अण्णा हंबर्डे आमदार दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघ)



