मनोरंजन

अक्षरोदय साहित्य मंडळ या साहित्य संस्थेची वार्षिक कार्यकारणी बैठक संपन्न

 

दिनांक ०५.११.२०२३ रोजी अक्षरोदय साहित्य मंडळ महाराष्ट्र या साहित्य संस्थेची वार्षिक कार्यकारणी बैठक कवी मारोती मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही बैठक सहयोग नगर, नांदेड या कार्यालय मध्ये घेण्यात आली. बैठकीत अक्षरोदय साहित्य मंडळाचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते. या बैठकीत आगामी कार्यक्रम बद्दल चर्चा करण्यात आली व येत्या मार्च मध्ये भव्य दिव्य अक्षरोदय साहित्य संमेलन घेण्याचे ठरले आहे. त्या मध्ये अक्षरोदय महिला गौरव पुरस्कार व अक्षरोदय साहित्य गौरव पुरस्कार २०२३ देण्याचे ठरले आहे. या साहित्य संमेलनामध्ये कथा,कविता, परिसंवाद व मंडळ ठराव घेण्याचे ठरले आहे.

 

या अक्षरोदय साहित्य संमेलनामध्ये तळा गाळाचे कवी ज्यांना विचारमंच उपलब्ध होत नाही त्यांना अक्षरोदय विचारमंच उपलब्ध करून देणाचे कवयित्री सिंधुताई दहिफळे यांनी प्रतिपादन केले आहे व सभासद नोंदणी मोठ्या संख्येने करावे असे नमूद केले आहे. कवी चंद्रकांत चव्हाण यांनी गुरू पौर्णिमा निमित्त कविसंमेलन घेण्याचे सुचवले आहे व नियोजनाचे कार्यभार त्यांनी स्वतः हा करणार हे बैठकीत सांगितले. कवियत्री उषाताई ठाकूर यांनी भावनिक होऊन साहित्य मंडळ हे एक समाजाचे प्रबोधन करणारे माझे घर आहे असे त्यांनी बैठीक बोलल्या बैठकीत पुढील वर्षातील कार्यक्रम बद्दल सर्वानुमते चर्चा करण्यात आली अक्षरोदय साहित्य संस्थेने वाचन संस्कृती व साहित्य निर्मिती मध्ये खारीचा वाटा घेईल व नवीन कवी व साहित्यिक जोडण्याचे कार्य करणार या बद्दल सर्वानुमते ठराव करण्यात आला या बैठकीत मंडळ अध्यक्ष कवी. मारोती मुंडे उपाध्यक्षा कवयित्री. सिंधुताई दहिफळे सचिव कवी. नरेंद्र धोंगडे सहसचिव कवी. चंद्रकांत चव्हाण कोषाध्यक्षा कवयित्री. उषाताई ठाकूर कार्याध्यक्ष कवी. सदानंद सपकाळे सदस्य कवयित्री. बालिका बरगळ कवियत्री. माया तळनकर कवी थोरात बंधू कवी आ. ग. ढवळे कवी भगत दहिफळे सर हे मान्यवर कवी उपस्थित होते सर्व कवी यांचे मनोगत झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष यांनी बैठकीचे अध्यक्षीय समारोप केला व बैठक संपन्न झाली.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *