मुगट प्राथमिक आरोग्य केंद्रास सीईओ मीनल करनवाल यांची भेट


नांदेड,3- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी मुदखेड तालुक्यातल्या मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ अंजुम जिकरे यांची उपस्थिती होती.
कुपोषणमुक्ती तसेच गरोदर माता व बालकांच्या सकस आहाराविषयी उपस्थित आशा वर्कर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मार्गदर्शन केले. बाळंत कक्ष, शस्त्रक्रिया गृह, औषधी भांडार, शीतसाखळी गृहाची त्यांनी पाहणी केली. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या दोन घनदाट वृक्ष लागवड ठिकाणास भेट देऊन करनवाल यांनी समाधान व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.



