व्हिडीओशिक्षण

कै.काळे महाविद्यालयात जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 नांदेड दि.12 देगलूर नाका येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात आदर्श माता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली जयंती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत करण्यात आले होते यावेळी प्रा.डॉ.स्मिता कोंडेवार यांच्या हस्ते मासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.आदर्श माता कशी असावी याचे इतिहासातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ या आहेत तर युवक कसा असावा युवकांनी आपले आचरण कसे ठेवले पाहिजे यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद हे होते.या दोन्हीही महान विभूतींना जयंतीनिमित्त अभिवादन करून विद्यार्थ्यांपुढे आदर्श जीवनपद्धतीचा दाखला ठेवण्यात आला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.बाबासाहेब भुकतरे,प्रा. शेख नजीर, प्रा. सय्यद सलमान प्रा. नुरी बेगम, प्रा. फर्जाना बेगम,प्रा फराज सर, प्रा.दानिश, प्रा.निजाम मोहम्मद मोहसीन,अक्षय हासेवाड, गौस खान पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *