Uncategorized

बिलोली येथील वादग्रस्त ईनामदाराची विरासत नामंजूर

ईनामदार पडले तोंडघशी, विरासत नामंजूर झाली पण जमिनीवर शासन ताब्यात कधी घेणार…?  बेकायदेशीर अतिक्रमण धारकांवर कार्यवाही अटळ

नांदेड/प्रतिनिधी येथील शहिद नवाबसरफराज खान दर्गा व मशिदीच्या विरासतसाठी शौकत बेग ईनामदार व ईतरांनी यांनी दाखल केलेला अर्ज कायदेशिर नसल्यामुळे तो नामंजूर करुन सर्व वादग्रस्त ईनामदाराची विरासत रद्द करण्याचा ऐतिहासिक आदेश उपविभागिय अधिकारी सचीन गिरी यांनी दि.९ जुलै २०२४ रोजी दिला असून या निर्णयामुळे अनाधिकृतपणे ईनामी जागेवर बेकायदेशिर कब्जा करुन ठाण मांडून बसणारे ईनामदार आता तोंडघशी पडले असल्याचे दिसून आले.

बोधन-नरसी रोडवर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकीच्या असलेल्या ऐतिहासिक शहिद नवाब सरफराजखान कला दर्गा व मशिद यांच्या नावे स.क्रं.५७७,५८० च्या विरासात मंजुरीसाठी येथील वादग्रस्त मुतवल्ली शौकत बेग ईनामदार यांनी व अजिज बेग ईनामदार व ईतरांनी उपविभागिय कार्यालयात अर्ज दाखल केला होता.विरासत मंजुरीच्या कार्यवाहीस जवळजवळ सतरा आक्षेपकांनी आक्षेप,हरकत घेत ईनामी जमिनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण झाले असून शर्तभंग झाल्यामुळे सदरिल सर्व जमिन शासन ताब्यात घेण्यासाठी विनंती अर्ज केला होता.याबाबत उपविभागिय अधिकारी यांच्या न्यायालयात आक्षेपकांना व अपिलार्थी या सर्वांनाच नोटिस पाठवून वेळोवेळी सुनावणी घेऊन सर्वांचेच म्हणणे ऐकुन घेण्यात आले.

अर्जदार शौकत बेग यांनी त्यांंचे वडिल महेमुद बेग ईनामदार यांच्या नावे विरासात मंजुर झाल्याचे कोणतेच कागदपञ सादर केले नाही.सदर अर्ज सोळा वर्ष विलंबाने दाखल केला होता.उपजिल्हाधिकारी देगलूर यांनी दि.९ सप्टेंबर २००९ रोजी शौकत बेग यांचे अर्ज खारीज करुन सर्व ईनामी जमिन शासन ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.शासनाचे परिपञक दि.३० जुलै २०१० राज्यातील देवस्थानच्या जमिनीचे बेकायदेशिर हस्तांतरण झाले असल्यास व परिच्छेद ३ नुसार अतियात ईन्कावयरी एक्ट १९५२ कलम ३ नुसार विरासत मंजुरीची कार्यवाही झाली नसल्यास जमिन एकसाला लागणसाठी घ्यावी आसे आदेश दि.९ मार्च २०११ रोजी अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले होते.उपरोक्त नमुद सर्व बाबींचे अवलोकन केले असता अर्जदार अपिलार्थी शौकत बेग ईनामदार यांनी विरासत मंजुरीसाठी केलेला अर्ज कायदेशिर नसल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.

तसेच अनुक्रमे अजीज बेग अमजद बेग ईनामदार,रफिक बेग हसन बेग,मिर्झा सरफराज बेग मिर्झा अमीर बेग यांनी विहित मुदतीत विरासत मंजुरीचा अर्ज सादर करु न शकल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात येते असे आदेश उपविभागिय अधिकारी सचिन गिरी यांनी दिले आहे.

 


ऐतिहासिक मशिद व दर्गा ची हि ईनामी खिदमतमाश जमिन असून मुळ मुंतखब धारकाच्या नंतर कोणाचीही विरासत मंजूर झाली नसल्यामुळे स्वंयघोषित वारसदार तथा भुमाफियांनी आपले डोके वर काढले असून राज्य संरक्षित स्मारकालगत अवैध मंगल कार्यालयासह दुकाने थाटुन ते भाड्याने,लिजवर देणे असे प्रकार घडत असल्यामुळे स.क्र.५७७,५८० जमिनीचे शर्तभंग झालेले आहे.हि सर्व ईनामी जागा तातडीने एकसाला लावावे अशी मागणी होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *