Uncategorized

नांदेड–संतरागाछी साप्ताहिक रेल्वेगाडीच्या एक फेरीचे रद्दीकरण

 

चक्रधरपूर विभागातील बंडामुंडा A केबिन ते राऊरकेला विभागादरम्यान 5व्या रेल्वे मार्गाच्या कमिशनिंगसाठी नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व रेल्वेकडून काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार नांदेड विभागातून धावणाऱ्या खालील साप्ताहिक रेल्वेगाड्यांची एक फेरी रद्द करण्यात आली आहे:

* रेल्वेगाडी क्रमांक 12767, हजूर साहिब नांदेड – संतरागाछी साप्ताहिक रेल्वेगाडी — 28 सप्टेंबर 2026 रोजीची फेरी रद्द.

* रेल्वेगाडी क्रमांक 12768, संतरागाछी – हजूर साहिब नांदेड साप्ताहिक रेल्वेगाडी — 30 सप्टेंबर 2026 रोजीची फेरी रद्द.

प्रवाशांनी या कालावधीत प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेगाडीच्या वेळापत्रकाची व उपलब्ध पर्यायी रेल्वेसेवांची माहिती तपासून प्रवास करावा, असे आवाहन नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *