शहर

डॉ. सान्वी जेठवाणी नांदेड दक्षिण मधून अपक्ष उमेदवारी भरणार

 

नांदेड येथील प्रसिद्ध कलावंत व तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता ज्यांनी आपलं नावलौकिक महाराष्ट्र देश विदेशात नाव कमवून आज राजकारणात पदार्पण करत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी धनत्रयोदशी 29 तारखेला भरणार असल्याची माहिती दिली आहे.

अनेक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार स्त्री व पुरुषच दिले आहे तृतीयपंथी म्हणून आणि राजकारणात समाजकारणात अतिशय उत्तम असले तरीही आमचा विचार होत नाही. म्हणून आमच्यासारख्या उच्चशिक्षित असलेले व्यक्तींना राजकारणात येऊन समाज कार्य करण्याची संधी मिळेल या हेतूने जेठवाणी यांनी राजकारणात पदार्पण केले आहे.

नांदेड शहराचा विकास व माझ्या भागातील लोकांचं आवाज त्यासोबतच तृतीयपंथींचा विधानसभा सदस्य म्हणून सभागृहात आवाज गुंजवण्याकरिता मी हा मोठा पाऊल उचललेला आहे हा इंद्रधनु हातात घेत असताना अनेक आव्हाने पुढे येतील परंतु आपला निश्चय दृढअसून समाजकार्य करण्याची संधी मला मिळावी म्हणूनच मी आज विधानसभा निवडणुकीत उतरले असे त्यांनी प्रतिपादन केले.

नांदेडकरांनी एक मोठी संधी मला द्यावी व त्यांचा जनमानसातला एक उमेदवार विधानसभेत पाठवावा कलावंतांसाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक तृतीयपंथी कार्यकर्ता म्हणून ही एक मोठी संधी उपलब्ध होईल व नांदेडकरांनी यासाठी माझा पाठिंबा द्यावा अशी त्यांना अपेक्षा आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *