राजकारण

मतदारांसाठी, मतदान केंद्रावर सर्व आवश्यक, सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन

नांदेड दि. 31 ऑक्टोबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सुचवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करा. हिवाळ्यातील छोटा दिवस बघता प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक प्रकाश यंत्रणा असावी, असे आवाहन निवडणूक निरीक्षकांनी आज केले.
नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेल्या सामान्य ,खर्च आणि पोलीस निरीक्षकांची एकत्रित बैठक आज नांदेड विश्रामगृहामध्ये झाली.

या बैठकीला श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे),शेलेंद्रकुमार (भाप्रसे),श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) रण विजय यादव (भाप्रसे) कालु राम रावत (भापोसे),मृणालकुमार दास (आयआरएस ) मयंक पांडे ( आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर ,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, याशिवाय या निवडणुकीमध्ये जबाबदारी सोपविण्यात आलेले प्रत्येक विभागाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी निवडणुकी संदर्भात केलेल्या उपाययोजना व निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील केलेल्या तयारीचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील संवेदनशील केंद्र, यापूर्वी दाखल झालेले गुन्हे, आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेली जानमालाची जप्ती, कर्मचाऱ्यांची उपलब्धता मतदान व मतमोजणी केंद्रांची रचना व तयारी याबाबतचा एकूण आढावा सादर केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी देखील यावेळी जिल्ह्यात आलेल्या अतिरिक्त पोलीस दलाच्या कुमकची माहिती दिली.तसेच बंदोबस्त व तैनाती संदर्भातील माहिती दिली.आंतरजिल्हा व आंतरराज्यीय सीमा लक्षात घेता. करण्यात आलेली नाकाबंदी व तपासणी पथकांच्या कार्याबाबत ही माहिती दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी आदर्श आचारसंहितेच्या कडकपालना संदर्भात जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर उमेदवारांकडून विविध स्तरावर एकदा उमेदवारी निश्चित झाल्यानंतर होणाऱ्या खर्चाबाबत आयोगाच्या सूचनेनुसार कशा पद्धतीने निगराणी राखली जात आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने यांनी दिली.राज्य उत्पादन शुल्क अधिकारी तसेच विविध विभागाच्या प्रमुखांकडून यावेळी आढावा सादर करण्यात आला.

निवडणूक निरीक्षकांनी यावेळी आपल्या काही सूचना अधिकाऱ्यांना केल्या. मात्र मोठ्या संख्येने मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच बंदोबस्तासाठी येणारे विविध दलातील पोलीस कर्मचारी त्यानंतर मतदान केंद्रावर येणारे दिव्यांग व्यक्ती हिवाळा असल्यामुळे प्रत्येक केंद्रावर सायंकाळची दिवाबत्तीची उपाययोजना, बहिष्कार असणाऱ्या गावांची समजूत घालणे, व अन्य काही महत्त्वपूर्ण सूचना यावेळी निरीक्षकांनी केल्या. जिल्ह्यातील समस्त मतदारांना यावेळी निरीक्षकांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून मोठ्या संख्येने मतदान करण्याच्या आवाहनही केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *