मराठवाडा

“अल्पसंख्याक हक्क दिवस” बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 17 डिसेंबर :- #अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने बुधवार 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्याख्याता म्हणून सेवानिवृत सहसचिव अॅड. देविंदरसिंघ निर्मले व नांदेड सामाजिक विज्ञान नारायणा ई-टेक्नो स्कुलचे विभाग प्रमुख इरशाद अहमद हे संबोधित करणार आहेत. अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तुत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येकवर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्यावतीने “अल्पसंख्याक हक्क दिवस” म्हणून राबविण्यात येतो.
अल्पसंख्याक विकास विभाग परिपत्रक क्र. अविवि’ 2022/प्र.क्र.51/का-8 दि.16.12.2024 नुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कंची जाणीव / माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे सूचना प्राप्त आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *