पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी प्रकाश कांबळे यांची निवड

नांदेड : पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून नांदेडमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कांबळे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील भूमिका घेतली आहे.
त्यांच्या सक्रिय आणि झपाटलेल्या कार्यशैलीमुळेच त्यांच्यावर आता संपूर्ण मराठवाडा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी ते सातत्याने लढा देत आले आहेत. मराठवाड्यातील पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कांबळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



