जिला

पोलिसांचे तणाव व्यवस्थापनासाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी एक दिवसीय’स्व विकास स्व कार्य एक आनंदी कार्यशाळा’

 

पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून पोलिसांचे तणाव व्यवस्थापनासाठी व मानसिक स्वास्थ्यासाठी एक दिवसीय’स्व विकास स्व कार्य एक आनंदी कार्यशाळा’ घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून पोलिसांच्या दैनंदिन धावपळीच्या व तणावाच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारा तणाव त्याचे व्यवस्थापन व्यवस्थापन नियोजनासाठी व मानसिक सुदृढ स्वास्थ्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठी दिनांक 27/12/2024 रोजी मंथन सभागृह याठिकाणी प्रज्ञा मानस संशोधिका ज्ञान प्रबोधनी पुणे व एक्सलंट एड एच आर कन्सल्टन्सी नांदेड यांच्याद्वारे पोलीस प्रशासन अधिकारी वर्गासाठी एक आनंददायी कार्यशाळा स्व विकास स्व कार्य चे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमासाठी अतिथी मार्गदर्शक व प्रमुख उपस्थिती म्हणून मा. जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुरव सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती कीर्तीका उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार श्री अश्विनी जगताप तसेच शहरातील सर्व पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी असेच उपास 40 अधिकाऱ्यांनी सदर कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवला आहे. सदर कार्यक्रमांमध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी देखील पोलिसांवर काय काय ताण असतो कसा असतो व त्यांनी आपल्या तानाचे व्यवस्थापन कसे करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

तसेच श्रीमती गौरी कमलेश कुलकर्णी ऑर्गनायझेशनल ट्रेनर सायकॉलॉजिकल असेसमेंट आणि असेसर, डॉक्टर दीपक गुप्ते ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजिस्ट, इंद्रजीत बयास, सॉफ्ट स्किल ट्रेनर या तज्ञांनी कुटुंब व कर्तव्य यामध्ये समतोल साधून दैनंदिन आयुष्यामध्ये तणाव व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करून पोलिसांना दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवातून विविध पैलूंना स्पर्श केला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अश्विनी जगताप यांनी केले असून समारोप पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *