कृषी

जय योगेश्वर ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नरसी रोड लोहगाव ता.बिलोली येथील खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली.

लोहगाव ता. बिलोली येथे पृथाशक्ती फॉर्मर प्रोड्युसर क.लि.व NCCF यांच्या संयुक्त विधेमाने सोयाबीन खरेदी केंद्राव 2024-2025 अंतर्गत जय योगेश्वर ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नरसी रोड लोहगाव ता.बिलोली जि नांदेड येथील खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली. यावेळी केंद्रावर ग्रेडर,शेतकरी, कामगार सर्वजण उपस्थित होते केंद्राची पाहणी करत असताना बऱ्याचशा गोष्टीच्या सूचना केंद्रप्रमुखांना दिल्या.

शेतकरी हा आधीच निसर्गाच्या आपत्तीमुळे अडचणीत येत असतो या अडचणीसह व्यापराच्या कचाट्यातून त्यांना आधार देण्यासाठी व त्यांच्या शेतीमाल आधारभूत किंमत मिळण्यासाठी हे केंद्र सुरू केले आहेत त्यामुळे त्यांच्या माल आधारभूत किमतीच्या आधारे खरेदीला योग्य ती संधी मिळावी.

ज्या शेतकऱ्याचा नंबर आला असेल त्यांना योग्य वेळी माहिती द्यावी नसेल तर तुमचा नंबर येऊन गेला तुम्ही आलाच नाहीत अशा वेगवेगळ्या अडचणी दाखवून शेतकऱ्याची आढळून केली जाऊ नये. जुन्या मालाच्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी सोयाबीनला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांरी आर्थिक अडचण असताना सुद्धा आपले सोयाबीन व्यापाऱ्याला न देता घरात तसाच ठेवला आणि यावर्षी तरीआपल्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल म्हणून ते मागच्या वर्षीचे सोयाबीन नाफेड अंतर्गत खरेदी केंद्रावर घेऊन येत आहेत पण शासनाच्या कुठल्या सूचना नसताना जुने सोयाबीन खरेदी केल्या जात नाही अशी माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिल्या नंतर अनेक प्रश्न उपस्थित करून ग्रेडरला धारेवर धरले या संदर्भामध्ये माहिती मागून शेतकऱ्याचा जुने सोयाबीन घेण्याच्या सूचना या ठिकाणी त्यांनी दिल्या.

वजन काट्याच्या संदर्भात कसलीही फसवणूक न करता शेतकऱ्याला त्याच्या शेतातल्या मालाला योग्य न्याय दिला पाहिजे अशी सूचना केली यावेळी लोहगाव परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,दिलीप पाटील पांढरे,वेंकट नायनवड मामा (मा.सद्स्य जि.प.) उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *