राजकारण

एम के बॅंकेट हाॅल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा, आमदार चिखलीकर आणि युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची उपस्थिती.

 

आज रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी नांदेड शहरातील एम के बॅंकेट हाॅल सांगवी तरोडा शिव रोड अल रिजवान शाळेजवळ चैतन्यनगर येथे जिल्हा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन पठाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांचा आज पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेश सोहळ्याचे अध्यक्ष लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस ॲड.मोहम्मद खान पठाण, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी.शहाराध्यक्ष जीवन पाटिल घोगरे.शहर कार्याध्यक्ष फेरोज पटेल.सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड.संघरत्न गायकवाड, ॲड.बाळासाहेब सोनकांबळे, दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर, उत्तर जिल्हाध्यक्ष अतुल हिंमगीरे, युवक प्रदेश सरचिटणीस कन्हैया कदम, सचिन जाधव, उद्योग विभागाचे श्रीधरराव नागापुरकर, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदाताई जोगदंड, महिला शहर अध्यक्षा सुरेखाताई पाटिलसह सर्वच सेलचे अध्यक्ष व युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तदनंतर असंख्य युवकांचा पक्ष प्रवेश करून घेत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नवनियुक्त तरूणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या यावेळी सुचना दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *