माळेगाव येथे मिडिया सेंटरचे उद्घाटन

श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, 2 जोनवारी- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे माध्यमांना माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिडीया सेंटरची स्थापना करण्यात आली असून गुरुवार दिनांक 2 जोनवारी रोजी माळेगाव ग्राम पंचायतीमध्ये मिडीया सेंटरचे उदघाटन उपसरपंच बालाजी नंदाने यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी मिडीया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्यवहारे, शिवाजी टोम्पे, डॉ. नंदलाल लोकडे, दत्ता इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, विस्तार अधिकारी संभाजी धुळगंडे, पत्रकार प्रेमानंद कांबळे, कीर्तीमाला महाबळे, बाळासाहेब मुद्दे, संतुक मुकनर, ग्राम विकास अधिकारी बी.सी. देवकांबळे, हनमंत धुळगंडे, साहेबराव राठोड, पांडूरंग घोरपडे, टी.एस. घोगरे, देवकत्ते डी.जी., एन.ए. मंदे खंडू साखरे, लक्ष्मण रायबोले, बंडू वाघमारे, अम्रपाली मिलिंद वाघमारे, यांची उपस्थिती होती.
माळेगाव ग्राम पंचायतीमधे मिडीया सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने चालणा-या विविध उपक्रम व कार्यक्रमाची माहिती खाते प्रमुखांनी मिडीया सेंटरला द्यावी. जणेकरुन माध्यमांना वेळेत माहिती देता येईल असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले आहे.



