मराठवाडा

लाईन ब्लॉक मूळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार तर मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द

 

नांदेड रेल्वे विभागातील रंजणी आणि कोंडी दरम्यान दिनांक 3 जानेवारी ते 09 जानेवारी 2025 दरम्यान चार तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत आणि धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द गाडी :
1. गाडी क्रमांक 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस दिनांक 03, 05, 06, 09 आणि 10 जानेवारी दरम्यान धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी नांदेड ते मनमाड अशी धावेल.

उशिरा धावणाऱ्या गाड्या :

1. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्सप्रेस दिनांक 04, 05, 08 आणि 09 जानेवारी 2025 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल.
2. गाडी क्रमांक 17232 नगरसोल-नरसापुर दवी-साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 04 जानेवारी 2025 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल.
3. गाडी क्रमांक 12788 नगरसोल-नरसापुर एक्सप्रेस दिनांक 05, 08 आणि 09 जानेवारी 2025 रोजी 90 मिनिटे उशिरा धावेल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *