हेल्थ

माळेगाव यात्रेत आज मोफत महिला आरोग्‍य तपासणी शिबीर

पारंपारिक लोककला महोत्सव; यात्रेत रंगणार परंपरेचा जल्लोष

 

नांदेड,२ जानेवारी- जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेत विविध कार्यक्रम घेतले जात असून, आज मोफत महिला आरोग्य तपासणी व पारंपारिक लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांनी निरोगी आरोग्‍याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. परंतू विविध कामाच्‍या व्‍यापामुळे त्‍या स्‍वत:कडे दुर्लक्ष करतात. त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या काळजीसाठी आज माळेगावा यात्रेत मोफत महिला आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकळी 11 वाजता माळेगाव येथील आयुर्वेदीक रुग्‍णालयात हे शिबीर होणार आहे. भोकर विधानसभा मतदार संघाच्‍या आमदार श्रीजया चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते या शिबीराचे उद्रघाटन करण्‍यात येणार आहे.

यावेळी महिला बाल विकास विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबीरात मधुमेह तपासणी, उच्‍च रक्‍तदाब, -हदय विकार, पोटाचे विकार, स्‍तनाचे गाठीचे निदान, फुफूसाचे विकार, रक्‍त तपासणी, मुखरोग विकार, एचआयव्‍ही तपासणी, सिकलसेल, क्षयरोग आदींची मोफत तपासणी करण्‍यात येणार आहे. यावेळी स्‍त्रीरोग तज्ञ डॉ. जी.आर. चव्‍हाण, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. देबनाथ रिचा, डॉ. एल.एस. पेंडकर, डॉ. ज्ञानेश्‍वर केंद्रे आदी तज्ञ डॉक्‍टर तपासणी करणार आहेत. आरोग्‍य विभाग जिल्‍हा परिषद नांदेड व प्राथमिक आरोग्‍य केंद्र माळाकोळी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने या आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी महिला यात्रेकरु व भाविकांनी या आरोग्‍य शिबीराचा लाभ घ्‍यावा असे आवाहन आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

पारंपारिक लोककला महोत्सव
महाराष्ट्राच्या लोककलेचे जतन करण्यासाठी तसेच लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने दरवर्षी माळेगाव यात्रेत पारंपरिक लोककला महोत्सव घेण्यात येतो. आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी पारंपारिक लोककला महोत्सव आयोजन करण्‍यात आले आहे.
आज 3 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पारंपारिक लोककला महोत्सव होणार आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार राजेश पवार उपस्थिती राहणार आहे.

पाच लोकनाट्य मंडळ दाखल
या पारंपारिक लोककला महोत्‍सवात माळेगाव योत्रेत येणा-या सर्व कलाकरांना संधी दिली जाणार आहे. तसेच यात्रेत दाखल झालेले रघुवीर खेडकर नाट्य मंडळ सातारा, पांडुरंग मुळे नाट्य मंडळ, आनंद लोकनाट्य मंडळ, शिवकन्या बडे नाट्य मंडळ , सविता पुणेकर नाट्य मंडळाचे बहारदार सादरीकरण होणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *