स्पोर्ट्स

राज्यस्तीय तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे यश….

 

सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटना, सिंधुदूर्ग व महाराष्ट्र राज्य अॅक्वेटीक असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे मालवण जि. सिंधुदूर्ग येथे आयोजित 14 व्या राज्यस्तीय सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव, जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर यांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे.

सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटना, सिंधुदूर्ग व महाराष्ट्र राज्य अॅक्वेटीक असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे दिनांक 21 व 22 डिसेंबर, 2024 रोजी मालवण जिल्हा सिंधुदूर्ग येथे राज्यस्तरी सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील व परराज्यातील 1400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव यांनी तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धा 28.43 मिनीटात पुर्ण करून विशेष प्राविण्यासह 9 क्रमांक पटकावला तर जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर यांनी हेच अंतर 43 मीनीटात पुर्ण करून 17 वा क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगीरी केली. या यशा बद्दल मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी योग्य ते बक्षिस देवुन सत्कार केला आहे.

सदरची कामगीरी बद्दल मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. डॉ. अश्विीनी जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी कंधार चार्ज गृह पोलीस अधीक्षक नांदेड, श्री विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक, पो.मु. नांदेड, क्रिडा प्रशिक्षक श्री संतोष सोनसळे यांनी सदर अंमलदाराचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील क्रिडा स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *