स्पोर्ट्स

शनिवारी रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने!

बीएसएफ, इंडियन आर्मी, कस्टम मुंबई, यूनियन बँक, ऑरेंज सीटी, साईं एक्सेलेंसी, ए. जी. नागपुर आणी अमृतसर क्वार्टर फायनल

– स. रविंदरसिंघ मोदी –
नांदेड दि. 3 जानेवारी : येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट अंतर्गत शुक्रवारी साखळी सामने संपले असून शनिवारी बलाढ्य आठ संघामध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत. यात इंडियन आर्मी जालंधर विरुद्ध कस्टम मुंबई संघात सकाळी 10 वाजता पहिला सामना खेळला जाईल. त्यानंतर बीएसएफ जालंधर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर यांच्यात दूसरा सामना सकाळी 11.45 वाजता दरम्यान खेळला जाईल. तीसरा सामना साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध यूनियन बँक मुंबई यांच्यात दुपारी 13.30 वाजता होईल. तर चौथा आणी शेवटचा सामना ए. जी. नागपुर विरुद्ध एस. जी. पी. सी. अमृतसर यांच्यात खेळला जाईल.

शुक्रवारी एकूण पाच सामने खेळले गेले. त्यात पहिला सामना ए. जी. नागपुर विरुद्ध ऑरेंज सीटी नागपुर संघादरम्यान खेळला गेला आणी हा सामना 1 विरुद्ध 1 गोल अनुसार बरोबरीत सुटला. हा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघास समान गुण मिळाले आणी दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. आजचा दूसरा सामना यूनियन बँक मुंबई विरुद्ध चार साहबजादे हॉकी अकाडेमी नांदेड मध्ये खेळला गेला. यूनियन बँक संघाने हा सामना 6 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. कार्तिक पटारे याने यूनियन बँक मुंबई साठी 3 गोल केले.

आजचा तीसरा सामना एमपीटी मुंबई विरुद्ध साईं एक्सेलेंसी संभाजीनगर यांच्यात खेळला गेला. साईं एक्सेलेंसी संघाने हा सामना 2 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. चौथा सामना पीएसपीसीएल पटिआला आणी सूफियाना क्लब अमरावती संघात खेळला गेला. पटिआला संघाने हा सामना एकतर्फा ठरवत 5 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. देविंदरसिंघ याने संघासाठी दोन गोल केले.

आजचा शेवटचा सामना ए. जी. हैदराबाद विरुद्ध एसजीपीसी अमृतसर यांच्यात खेळला गेला. अमृतसर संघाने हा सामना 4 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला आणी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. कमलजीतसिंघ याने सामन्यात दोन गोल केले. आजच्या विविध सामन्यात राजकुमार झा, रतिन्दरसिंघ बरार, गुरप्रीतसिंघ, सिद्धार्थ गौर, करणदीपसिंघ, अश्विनीकुमार यांनी पंच म्हणून कामगीरी पहिली. गुरमीतसिंघ, राहूल राज, गुरतेजसिंघ, प्रिंससिंघ, विजय प्रकाश मंगलूरकर यांनी तांत्रिक पंच म्हणून कार्य केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *