महानगरपालिका हद्दीतील अतिवृष्टीग्रस्त लोकांना आर्थिक मदत देण्याची मागणी

नांदेड दि. 17. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टी ने बाधित झालेल्या गोदावरी नदी काठावरील झोन क्रमांक ५ मधील विविध नगरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे शहर अध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
सप्टेंबर 2024 च्या सुरुवातीला झालेल्या भीषण अतिवृष्टीने गोदावरी नदीला पूर येऊन सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यामुळे अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले या नागरिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला पण अद्याप पर्यंत कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही.
राज्य शासनाकडून काही अतिवृष्ट भागांना आर्थिक मदत देण्यात आली आहे परंतु नांदेड मधील महानगरपालिका झोन क्रमांक ५ मधील नागरिकांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नांदेड शहर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.सदर निवेदनावर अतिवृष्ट बाधित अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.



