शहर

दिवाबत्ती देखरेख कडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी 

 

नांदेड दि. १७ नांदेड महानगरपालिकेच्या झोन क्रमांक पाच अंतर्गत येत असलेल्या आस कॉलनी अब्बाशी मस्जिद परिसरात मागील अनेक दिवसापासून सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था आहे बंद अवस्थेत आहे. याबाबतीत अनेक वेळा मागणी करून देखील दिवाबत्तीकडे लक्ष दिल्या जात नाही त्यामुळे या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहम्मद अब्दुल राऊफ अब्दुल गफार यांनी एका निवेदनाद्वारे अभियंत्याकडे अशी मागणी केली आहे की या परिसरातील दिवाबत्ती व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाही करण्यात यावी आणि लवकरात लवकर या परिसरातील दिवाबत्ती व्यवस्था सुरळीत करावी.

कारण येणाऱ्या आगामी रमजान महिन्यांमध्ये रात्रीच्या वेळेस अनेक मुस्लिम बांधव हे प्रार्थना करण्यासाठी घराबाहेर पडत असतात सार्वजनिक रस्त्यावरील दिवाबत्ती बंद असल्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची दखल घेऊन लवकरात लवकर आस कॉलनी, अब्बासी मस्जिद  परिसरातील दिवाबत्ती व्यवस्था सुरळीत करून सहकार्य करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहम्मद अब्दुल रौफ अब्दुल गफार यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *