देश विदेश

264 वे मराठा शौर्य दिवस सोहळा; शिवभारत, भारतीयांना स्वराज्याच्या संघर्षाशी जोडतो

मराठा वीरेंद्र, माजी सचिव, हरियाणा सरकार

 

बस्ताडा, कर्नाल पानीपत दि.14 जानेवारी २०२५ :- तिसरे युद्ध पानिपत अफगाण हल्लेखोर अब्दालीपासून भारताला वाचवण्यासाठी आलेल्या शहीद मराठा महावीरांच्या स्मरणार्थ आयोजित शौर्य दिन सोहळ्यात आज हजारो लोकांनी नमन केले. आज या ऐतिहासिक सोहळ्यात आंतरराष्ट्रीय मराठा इतिहासकार डॉ.वसंतराव मोरे, वेदवाचस्पती स्वामी संपूर्णानंद महाराज (नल्ली कला सनातन आश्रम, कर्नाल), आमदार रणधीरसिंह गोलन, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, कुटेल घरौंडाचे समाजसेवक समरसिंह कल्याण, कुटेलचे सरपंच विशाल कल्याण, बस्ताडाचे सरपंच सुरेशकुमार फौजी, मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, मराठा सेवा संघाचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष जिलेसिंग मराठा, शेतकरी नेते सेवासिंग आर्य, प्रसिद्ध समाजसेवक भाष्यकार श्री.जयपाल आर्य, मराठा जागृती मंचचे समन्वयक मिलिंद पाटील, क्रमश: मराठा सेवक कृष्णपाल, रामनारायण मराठा,रामपाल मुळे, ॲड ललित चौधरी, रणधीरसिंह खैंची, रणधीरसिंह खैची स्वराज्यजननी जिजाऊ माँ साहेबांचे वंशज शिवाजी राजे जाधव (सिंदखेडराजा, बुलडाणा) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठा समन्वय परिषदेने प्रकाशित केलेल्या शिवभारत दिनदर्शिका-2025 चे स्वामी संपूर्णानंद महाराज, डॉ. वसंतराव मोरे, मराठा वीरेंद्र जी आणि व्यासपीठावर उपस्थित वरील पाहुण्यांनी प्रकाशन व लोकार्पण केले. या वर्षी, प्रकाशनाचे मुखपृष्ठ तिसऱ्या पानिपत युद्धाच्या घटनेवर आधारित आहे. मुखपृष्ठावरील पानिपत युद्धाचा संदर्भ, शहीद मराठा वीरांचे प्रातिनिधिक प्रतिनिधीचे वंशज श्री मराठा वीरेंद्र जी आणि महाराजा महादजी सिंधिया यांचे वंशज, केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, पानिपत – १७६१, च्या चित्रासह मुखपृष्ठ सजवलेले आहे. तिसऱ्या युद्धात हरवलेल्या मराठा वंशजांचा शोध मोहिमेत योगदान देणा-या मंडळींपैकी प्रातिनिधिक स्वरुपात समाजसेवकांना मुखपृष्ठाशी तळटिप वर जागा देण्यात आली आहे. ज्यामध्ये राष्ट्रसंत भय्यूजी महाराज, मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील, शिवधर्म संसदेचे प्रा.मा देशमुख, डॉ.आ.साळुंखे, मराठा इतिहासकार डॉ.सतीशचंद्र गंगवार, डॉ.वसंतराव मोरे, आमदार रेखाताई खेडेकर, आमदार डॉ.मारोतीराव मुळे, ई. नेताजी गोरे, कामाजी पवार, ई.मधुकर मेहेकरे, प्रा. जयपाल आर्य, जिलेसिंग खैंची, प्रा. मीनाक्षी काळे पाटील, नसीबसिंग मराठा, कृष्णपाल, मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, डॉ.मंगेराम चोपडे, परमल सिंग, कमलजीत महल्ले, मराठा लोकसेवार्थी विधीज्ञ ॲड मिलिंद पवार.

याशिवाय दिनदर्शिकेच्या प्रत्येक महिन्यातील पानावर स्वराज्याच्या नऊ ठिकाणी कार्यान्वीत झाालेल्या स्वराज्य राजधानी केंद्राचे संस्थापक महाराज आणि त्यांची राजमुद्रा यांचे चरित्र आणि कार्य यावर संक्षिप्त भाष्याचे टिपण देण्यात आले आहे.

1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईतील धमश्चक्रीत परांगदा होण्याच्या स्थितीतील 250 वर्षांत, रोड या नावाशी आपली ओळख जोडून आपले जीवन जगणाऱ्या रोड समुदायाला त्यांच्या पूर्वज परंपरा, बोलचाल, शब्दावली, नामकरण, कुळ परंपरा, विवाह विधी, दैनंदिन संभाषण भाषेतील शब्दावली, ऐतिहासिक घटनांचे कथन करणारे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पिढ्यांपिढ्या पूर्वजांकडून आपल्या वर्तमान पिढ्यांना देण्यात आलेले वाक्प्रचार संदर्भावर आधारित पुस्तक डॉ. वसंतराव मोरे यांच्या पुस्तकाची सुधारीत आवृत्ती रोड मराठा इतिमहास चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. डॉ मोरे, मराठा विरेंद्र जी यांच्यासह डझनभर अभ्यासकांनी यात मेहनत घेतली. सोनीपत, पानिपत, कर्नाल, कैथल, कुरुफक्षेत्र, शामली, सहारनपूर इत्यादी भागात सुमारे 200 गावांमध्ये जनजागृती केल्यानंतर, मराठा वीरेंद्र वर्मा, माजी लोकसेवक ( IAS ) आणि हरियाणा मराठा जागृती मंचचे संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली रोड समाजाला मराठा ओळख देण्यात यश आले. मराठा जागृती मंचच्या नेतृत्वाखाली दिनांक 27 नोव्हेंबर 2005 रोजी हरियाणाच्या कर्नाल मधील कर्ण स्टेडियमवर मराठा वीरेंद्र जी यांनी जागतिक मराठा मिलन सोहळ्याचे आयोजन केले होते. छत्रपतीं शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या तोंडून हरियाणा व परिसरात वास्तव्यात असलेल्या रोड समाजाला मराठा म्हणून घोषित करण्यात आले.

या ऐतिहासिक सोहळ्यात युवाराष्ट्रसंत स्मृतिशेष भय्यूजी महाराज, सोलापूरचे तत्कालीन आमदार सुभाष देशमुख, आमदार रेखाताई खेडेकर, मंत्री डॉ.पतंगराव कदम, नागपूरचे महाराजा रघुजी भोसलेंचे वंशज मुधोजी भोसले, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्त्म खेडेकर, प्रदेशाध्यक्ष विजयसिंह महाडिक, प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, अनंत चोंदे, विकास पासलकर, गंगाधर बनबरे, शेकडो विचारवंत, इतिहास अभ्यासक डॉ.जयसिंगराव पवार,चंद्रसेन सावंत जी, दादासाहेब जगदाळे, मधुकर मेहेकरे, अविनाश काकडे, विजयकुमार शिंदे, रामचंद्र सत्रे, नेताजी गोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. ऐतिहासिक सोहळ्याचे राष्ट्रीय समन्वयक श्री. कमलेश पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समन्वय परिषद, माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ यांनी समन्वयाचे काम पाहिले. तर या सोहळ्यासाठी मेहनत घेणा-यांत हरियाणातून डॉ. मगेराम चोपडे, डॉ. परमल सिंग, धरमसिंह भोसले, कृणापाल जी, जोगिंदर मराठा जी, सामाजिक प्रवक्ते जयपाल आर्य (चौहान), कमलजीत महल्ले जी, अशोक भोसले, ललित चौधरी उपस्थित होते. या क्रांतिकारी परिवर्तनावर शिवभारत-ने देशभर प्रचार आणि प्रसारित करण्याचे कौतुकास्पद काम केले.

या ऐतिहासिक सोहळ्यात पानिपत युध्दातील वंशजांपैकी सुमारे दोन ते अडीच लाख कुटुंबांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. या सर्वांना छत्रपती घराण्याच्या मुखारविंदामधून मराठा ओ

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *