हेल्थ

नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागतील कर्मचारी यांचा प्रलंबित मागण्या लातूर येथे निवेदन

 

नांदेड :- नांदेड जिल्हातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत आज दि. 17 जानेवारी 2025 रोजी लातूर येथे मा डॉ. अर्चना भोसले-किर्दक मॅडम, उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर, मा डॉ वैशाली तांभाळे मॅडम, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप ) लातूर यांना नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत निवेदन देण्यात आले.

आश्वासित प्रगती योजना (10,20,30) लाभ देय बाबत लवकरच मा. विभागीय समितीची बैठक घेण्यात यावी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची दि. 1.1.2025 रोजी विभागीय सेवा जैष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात यावी. आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, क्षेत्र कर्मचारी संवर्गातून आरोग्य कर्मचारी पदी पदोन्नती करण्यात यावी या व इतर मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच मागण्या मान्य करण्यात येतील असे नांदेड जिल्हा संघटना पदाधिकारी यांना सांगण्यात आले.

यावेळी सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर कार्यालयातील राहुल जाधव सहाय्यक अधिक्षक, शेटकार मॅडम,सचिन कुलकर्णी, प्रभाकर मोरे, अखिल कुलकर्णी, नांदेड जिल्हा हिवताप संघटना जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकारी सत्यजीत टिप्रेसवार, सरचिटणीस माणिक गिते, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्याम अवचार, आरोग्य निरीक्षक देवानंद बोधगिरे, बालाजी कल्हाळे व अंनत धुळशेट्टे आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *