मराठवाडा

महाराष्ट्रातील आपले सरकार सेवा (महा ई सेवा ) केंद्र संचालकाचे विविध मागण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

परभणी दि. 22 जानेवारी – अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या परभणी जिल्हा संघटनेने विविध मागण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मध्ये सर्व केंद्र चालकाच्या मागण्या मध्ये सांगण्यात आले कि, महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) संचालक यांच्या माध्यमातुन गोरगरीब जनतेला राज्यशासनाचे विविध सेवा व सुविधा तसेच शासकीय योजना ग्रामिण व शहरी भागात ऑनलाईन पद्धतीने पोहचविण्याचे कार्य आम्ही महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) संचालक मागील १५ वर्षापासुन करीत आहोत.

सर्व शासकीय यंत्रणेसाबत हातात हात घालुन जनतेला उत्तम सेवा व सुविधा देत आलो आहोत व आजही देत आहोत. महाराष्ट्रस्तरीय महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) संचालक संघटनेच्या माध्यमातुन आम्ही महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) संचालकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते, तरी त्यांच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत
१. महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) संचालक यांचा मृत्यु झाल्यास सदर केंद्र हे त्यांच्या वरसाचे नावे हस्तांतरीत करण्यात यावे.

२. सन २००८ पासुन आजपर्यंत महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) या केंद्राचे सेवा शुल्क (Commission) वाढवलेले नसल्यामुळे सुरुवातीपासुन आजतागायत र.रु.८ प्रमाणे प्रती दाखला आम्हास मिळत आहे. तरी आजच्या महागाईचा विचार करीता प्रत्येक दाखलामागे व्हि. एल.ई. यांना १०० रु कमिशन देण्यात यावे.
३. प्रत्येक महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) संचालक व त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य विमा (Mediclame Policy) शासना तर्फे उतरवुन देण्यात यावा.

४. महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) हे पुर्वी लोकसंख्यानिहाय वाटप करुन देण्यात आले आहेत परंतु आता नव्याने वाटप करणेसाठी कोणतीही नियमावली नाही आहे. तरी नवीन आपले सरकार सेवा केंद्र देणे बंद करण्यात यावे कारण पुर्वी नेमलेले केंद्र चालक यांनी शासन, प्रशासन व नागरीक यांचा दुवा होऊन इमाने इतबारे शासनाच्या सर्व योजना डिजीटल स्वरुपात यशस्वीपणे नागरिकांपर्यंत पोहचवुन यशस्वी केले आहे. सरकारी काम सहा महिने थांब ला पुर्णपणे रोखुन सरकारची व प्रशासनाची विश्वासहर्ता केंद्रचालकांच्या माध्यमातुन सफल केलेली आहे. कृपया सदर केंद्र वाटप जाहिरातीस रद्दबादल करुन द्यावे हि विनंती. मागील १५ वर्षापासुन आम्ही सेवा देत आहोत तरी आमचा रोजगार हिरावल्यास आम्ही बेरोजगार होऊन आम्हा सर्वांवर व कुटुंबियांवर उपासमारीचे संकट येणार नाही याबाबत विचार करण्यात यावे.

५. महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) लॉगिन करतेवेळी GPS व OTP प्रणाली सुरु करुन देण्यात यावी कारण काही नविन केंद्र चालक यांनी आपले लॉगिन आय डी जास्त पैसा कमविण्याचा नादात दुसऱ्या/तिहाईत व्यक्तीस दिले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये बरेच संभ्रम निर्माण होऊन विश्वासहर्ता गमविण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
६. FIRST IN FIRST OUT (FIFO) प्रणाली पुर्ववत सुरु करण्यात यावी तसेच वगळा (SKIP) हे OPTION कमी करण्यात यावे.

७. आधार हे प्रत्येक व्यक्तीचे विशेष ओळखीचे प्रमाण आहे ज्यावरुन त्यांचे खाजगी, अर्थिक व्यवहार देखील करता येते. सदरचे आधार किट हे महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यांनाच देण्यात यावे. काही ठिकाणी खाजगी व्यक्ती यांना देण्यात आले आहेत.
८. सन २०१३ पासुन आजतागायत आधार चे कोणत्याही SCA कंपनी हिशोब, पेमेंट किंवा कमिशन दिलेले नाही तरी ते संबंधित कार्यालयामार्फत देण्यात यावे.
९. महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यांच्या विरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी व महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रतिनीधींना विश्वासात घेवुन किंवा समिती नेमुन निर्णय घेण्यात यावे. शहानिशा तसेच दोन्ही वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकुण योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

१०. योजना दुत चा दर्जा महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यांना देण्यात यावा.
११. शासनाच्या सर्व सोयी व सुविधा चालु आहेत त्या सोबत नवनविन सर्व उपक्रम ह्या ऑनलाईन प्रणालीमार्फत महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) मधुनच राबविण्यात यावे. उदा. मुख्मंत्री माझी लाडकी बहिणर योजना, बांधकाम कल्याणकारी योजना, दुय्यम निबंधक कार्यालय सेवा, पुरवठा इ. प्रकारच्या
१२. राज्यातील महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यांचे बंद असलेले आधार केंद्र लवकरात लवकर सुरु करुन देण्यात यावे तसेच अद्यावत लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, इतर सर्व मशिन पुरविण्यात यावे.
आशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुहास पंडित, प्रदेश प्रतिनिधी संतोष भवानकर, सचिव सचिन शेटे, उपाध्यक्ष आदित्य बाकाळे, मोहम्मद ईद्रीस, बालाप्रसाद डागा, सुरेश सोनावणे,दीपक शेळके,नरहरी चव्हाण संतोष जी व इतर केंद्र चालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *