शिक्षण

राज्यस्तरीय जनहित पुरस्कार २०२५ जाहीर

सोनखेड येथील ग्रामीण साहित्य संमेलनात २७ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण

नांदेड – समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी यशस्वी व्हावे आणि त्यातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) ता. लोहा या संस्थेच्यावतीने यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय जनहित पुरस्कार दिले जातात. या वर्षी बालाजी इबितदार जनहित जिवन गौरव, द.भ.प. राम भारती महाराज, राज्यस्तरीय जनहित अध्यात्मिक, प्राचार्य डी.पी. कदम, राज्यस्तरीय जनहित

शिक्षणरत्न,डॉ. ललिता शिंदे, राज्यस्तरीय साहित्यरत्न, ह.भ.प. अरविंद महाराज सोनखेडकर राज्यस्तरीय अध्यात्मिक, राजेश्वर कांबळे, राज्यस्तरीय दर्पण पत्रकारिता, प्रा. महेश कुडलीकर राज्यस्तरीय जनहित साहित्यरत्न, डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर राज्यस्तरीय स‌द्भावना, सी.आर. पंडित राज्यस्तरीय कथारत्न, भगवान इंगोले राज्यस्तरीय जनहित कृषीरत्न, अशोक कुरुडे राज्यस्तरीय जनहित साहित्यरत्न, कवि आत्माराम राजेगोरे, राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, बाळासाहेब खिल्लारे, राज्यस्तरीय जनहित समाजभुषण, व्यंकटेश काटकर राज्यस्तरीय जनहित साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर झाले असून भारतीय संविधानाची प्रत, सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा (दे) ता. लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहा तालुक्यातील सोनखेड येथे २७ जनेवरी रोजी तिसरे राज्यस्तरीय जनहित ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न होणार असून या साहित्य साहित्य संमेलनास उद्घाटक म्हणून लोहा- कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, विषेश निमंत्रित म्हणून कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त आ. हेमंत पाटील, नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर तर स्वागताध्यक्ष म्हणू सोनखेडचे उपसरपंच सुनील साहेबराव देशमुख मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *