शिक्षण

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे भित्तीपत्रकाचे सादरीकरण

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे भित्तीपत्रकाद्वारे सादरीकरण करण्यात आले.यावेळी उपस्थित अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, कोषाध्यक्ष कैलासचंद्रजी काला, ने.सू.बो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.वाय.कुलकर्णी,माजी प्राचार्य डॉ. एस.व्ही.शिवणीकर,उपप्रचार्या डॉ. कल्पना कदम,इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सर्व भित्तीपत्रकास भेट देऊन सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या सादरीकरणात पद्दूत्तर व पदवीचे विद्यार्थी वैशाली मोरे,निकिता कानोळे,प्रियंका लामतलवारे,सुप्रिया अरटवार,पूजा तोरणे,दीपाली खिलारे, दिशा येळगे,प्रीती लबडे,आयान सय्यद आणि शिवशंकर देशमुखे आदिंचा समावेश होता.या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ.सागर साकळे याचे अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे व ने.सू.बो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.वाय. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *