हेल्थ

कर्करोग आरोग्य सेवा अभियान 04 -02- 2025 पासून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख

 

4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि जिल्हा शल्यचकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या नियोजनाने नांदेड जिल्ह्यात कर्करोग मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तंबाखूमुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस युनायटेड बाय युनिक या संकल्पनेवर साजरा करण्यात येणार आहे. या दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 30 वर्षपेक्षा अधिक वयोगट असणाऱ्या नागरिकां करिता कर्करोग आरोग्य मोहीम राबवून मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. सदर मोहिमे करता राज्य शासनाने ” एकजूट होऊ या, कर्करोगाला हरवू या ” हे घोषवाक्य निश्चित केले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख्याने कर्करोग सदृश्य व कर्करोग बाधित रुग्णांना योग्य निदान आणि कर्करोग उपचार सर्व आरोग्य संस्थेमध्ये आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत.जसे की कर्करोग तपासणी, कर्करोग निदान, कर्करोग उपचार (शास्त्रक्रिया, किमोथेरपी,रेडिएशन,पॅलिएटिव्ह ) याबाबत आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. तसेच याबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी आणि नागरिकांना कर्करोगा बाबतीत आरोग्य सेवा मेळाव्यात व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कर्करोग अभियान प्रभावीपणे राबवण्याकरिता सर्व स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत जनजागृती करण्यात यावी अशा सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. हा आजार सुरुवातीला माहित पडत नसल्याने आजाराचे स्वरूप गंभीर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे लक्षण असो किंवा नसो महिलांनी व पुरुषांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यात कर्करोग चे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग. हे कर्करोग स्त्रियात जास्त दिसून येतात.

गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे नेमके काय ?

सर्वप्रथम सर्वप्रथम गर्भाशय मुखाचा कर्करोग समजून घेणे महत्त्वाचे आहेत. पाच प्रकारचे कर्करोग आढळून येतात हे कर्करोग स्त्रीच्या जनन संस्थेतील इंद्रियावर म्हणजे गर्भाशय मुख बिजाडनलिका व गर्भाशय. योनी आणि योनी मार्गावर परिणाम करतात. गर्भाशय मुख सर्वात खालचे अरुंद टोक असते कर्करोगाची सुरुवात जेव्हा गर्भाशय मुखापासून होते. तेव्हा त्याला गर्भाशय मुखाचा कर्करोग असे म्हणतात. आजाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याने त्यावर तपासणी निदान आणि उपचार आणि लसीकरण आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *