मराठवाडा

फ्रिडम मित्र मंडळाने काढला मानाचा संदल 10 उंट,15 घोडे, संदल मिरवणुकीचे आकर्षण..!

 

परभणी : सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे यांच्या ऊर्स निमित्त शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी शहरातील मराठवाडा प्लॉट येथील फ्रिडम मंडळाने ही आपली ४१ वर्षाची परंपरा कायम राखत मोठ्या हर्शोउल्हासात संदल काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात उंट, घोडे संदल मध्ये होते. संदल काढण्यापूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उंटाच्या पाठीवर फुलांची मानाची चादर चढवून संदल ला सुरुवात करण्यात आली.

मागील ११८ वर्षा पासून दर्गाह परिसरात भव्य दिव्य असा उर्स भरतो. या उर्सात देशभरातून व्यापारी येत असतात. तसेच भाविक ही दर्शनासाठी गर्दी करत असतात. उर्सा निमित जिल्हा प्रशासनाच्या वतीने पहिला मानाचा संदल काढण्यात येतो. या नंतर परभणी शहरातील विविध शासकीय कार्यालय तसेच मित्र मंडळाच्या वतीने ही संदल काढण्यात येतो. शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी प्रिâडम मित्र मंडळाच्यावतीने संदल काढण्यात आला.

यावेळी संजय सारणीकर, अमोल भालेराव, दिपक जैस्वाल, शेख रफीक,जावेद खान,व इतर उपस्थित होते.परिसरातील येथील भाविक मोठ्या संख्येने संदल मध्ये सहभागी झाले होते. संदल यशस्वीतेसाठी फ्रिडम मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *