Uncategorized

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमचे घुंगराळा येथे जिल्हास्तरीय उदघाट्न संपन्न.

 

नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ” हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम ” दि. 10 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान नांदेड जिल्यातील दहा तालुक्यात नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार,भोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट व माहूर या तालुक्यात राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मोहीमचे आज दि. 10 फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हास्तरीय उदघाट्न घुंगराळा ता. नायगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे मान्यवरांच्या उपस्थित डी.ई.सी व अलबेडाँझोल गोळ्या सेवन करण्यात आले. प्रथम धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवराच्या सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमसाठी अध्यक्ष नांदेड जिल्हा परिषदच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, प्रमुख पाहुणे मा. डॉ. वैशाली तांभाळे मॅडम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर, घुंगराळा सरपंच मा. वसंत पाटील सुगावे, जागतिक आरोग्य संघटना समन्वयक डॉ शिरीशा पटेल मॅडम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी, डॉ शिवशक्ती पवार, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन श्याम यमलवाड, शालेय समिती अध्यक्ष माधव पाटील ढगे, तंटामुक्ती अध्यक्ष श्याम ढगे, पोलीस पाटील राजेश तुरटवाड, पत्रकार दीपक गजभारे, श्री मोरे, श्री ढगे, मुख्याध्यापक राम अनकोड, ग्रामविकास अधिकारी हणमंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजक डॉ राजेश्वर माचेवार जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी केले. घुंगराळा येथील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ उपलंचवार, डॉ कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

मा. वसंत सुगावे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,जिल्हास्तरीय कार्यक्रम येथे आयोजित केल्या बदल आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले तसेच सर्व गावकरी यांना हत्तीरोगाच्या गोळया सर्वांनी सेवन करावे व हत्तीरोगा पासून मुक्त व्हावे. पुढील काळात आरोग्य विषयक शिबीर आयोजित करण्याकरिता अवगत केले.
डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी आपले मनोगतात म्हणाल्या की, कोणताही आजार होण्या अगोदर त्याचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे. या गोळया सर्वांनी जेवण करुन सेवन कराव्यात. या मध्ये काही दुष्परिणाम नाहीत. तसेच डास निर्मूलन साठी प्रतिज्ञा घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थी शुभांगी सूर्यवंशी,नम्रता ढगे, गणेश दंडेवाड, स्वप्नील ढगे यांनी सर्वा समक्ष गोळ्या सेवन केले. कार्यकमाचे सुरेख सूत्रसंचालन जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक व्यकटेश पुलकंठवार यांनी केले व आभार प्रदर्शन सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.

लातूर येथील आरोग्य निरीक्षक शंकर मोरे, सचिन कुलकर्णी हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी नायगाव डॉ श्रीकांत पटवेकर,डॉ काशिनाथ सोनवणे, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक संजय भोसले, माधव कोल्हे, हत्तीरोग कर्मचारी मनोहर खानसोळे, नागनाथ राऊलवार, बालाजी शिळे, शुभम चाबूकस्वार, कैलास वरपडे, एम डी शिंदे, देविदास पेढारकर, सपनर, नवाज, राऊत, वाहन चालक मुकुंद देवकांबळे, रामू यादव, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नायगाव येथील प्रियदर्शन खिलारे, संतोष साखरे, कैलास मठपती,शैलेश मच्छरलावार, भास्कर ढेरे, प्रा आ केंद्र कुंटूर येथील सर्व कर्मचारी, उपकेंद्राचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, शाळेतील सर्व शिक्षक बांधवानी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *