मराठवाडा

परभणीत ग्रंथोउस्तव उद्घाटन संपन्न..!

उच्च व तंत्र शिक्षण विभागी, ग्रंथालय संचानालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभणी आयोजित 17 व 18 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रंथोउस्तव 2024 चे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक केशव वसेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक संभाजी नगरचे सुनील हुसे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, ग्रंथमित्र रामेश्वर पवार, ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ, केंद्रीय विद्यालयाचे प्रा. राहुल नितनवरे, आदिंची उपस्थिती होती. ग्रंथ उस्तवाच्या दरम्यान पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची ही उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बी. एस. देवणे यांनी केले असून, आज संपन्न झालेल्या ग्रंथ उस्तवाचे संचालन कल्याण वसेकर यांनी केले तर आभार राधाकिशन कदम यांनी मानले. तर कार्यक्रमासाठी सचिन गायकवाड, कोंडीबा गाडेवाड यांनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *