महाराष्ट्रा

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द आणि सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन

नांदेड १६ फेबुरवारी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
​क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

​शासनाने 29 डिसेंबर,2023 व 25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा 14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेली असून,

प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासननिर्णय क्रं.शिछपु.2023/प्र.क्रं.188/क्रीयुसे-2, दि.29 डिसेंबर,2023 मधील नियम क्रं.1.19, नियम क्रं.1.20, नियम क्रं.1.21 अनवये एकूण गुणांकनासह 15 ते 18 फेब्रुवारी,2025 या कालावधीत सूचना व हरकतीसाठी https://shivchhatrapatiawards.com या लिंकवर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
​सदरचे प्राथमिक छाननी अहवाल हे अंतिम नसून, त्यामध्ये आपल्या सूचना व हरकतींनुसार बदल होऊ शकतो, तसेच सूचना/ हरकतीनंतर सदरचा अहवाल पुनश्च्य प्रसिध्द करण्यात येणार नाही.
​प्राथमिक छाननी अहवालात केलेल्‍या पुरस्कार गुणांकनाबाबत काही आक्षेप किंवा सूचना असतील तर त्या सोबत जोडलेल्या विहित नमून्यात सादर कराव्यात.

पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचे वेळापत्रक :
सुचना व हरकती सादर करण्याचा सुरुवातीचा 15 फेब्रुवारी,2025
सुचना व हरकती सादर करण्याचा अंतिम 18 फेब्रुवारी,2025 सांय 05 पर्यंत
पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन लिंक: https://shivchhatrapatiawards.com यावर ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *