शहर

वाजेगाव येथील मेजबान हाॅटेल मालकावर अखेर गुन्हा दाखल

(इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे बेकायदेशीर केलेले कृत्य अंगलट)

 

 

नांदेड प्रतिनिधि :- दिवस रात्र वाहतूक वर्दळ असलेला देगलूर – हैद्राबाद हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येतो. त्यानुसार या रस्त्याची नित्यक्रम देखभाल दुरूस्ती संबंधित विभागाकडून करणे बंधनकारक असते. त्याशिवाय या रस्त्यावर कसल्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा अनाधिकृत खोदकाम केल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध तत्पर कारवाई करण्याचे दायित्व हे संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता,उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे असते.परंतु या विभागाच्या बेजबाबदार अभियंत्यामुळे देगलूर- हैद्राबाद रस्त्यावर वाजेगाव पोलीस चौकीच्या बाजूस एका नामांकित हाॅटेल मालकाने हाॅटेलचे सांडपाणी व मलनिस्सारणासाठी मुख्य रस्त्यावर अनाधिकृत खोदकाम करून पाईप लाईन टाकली आहे.

त्यामुळे या खड्ड्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होऊन वाहनधारकांचे शारीरिक व आर्थिक नुकसान होत आहे.अधिक माहिती अशी की, देगलूर-हैद्राबाद मुख्य रस्त्यावर वाजेगाव पोलीस चौकी जवळ हाॅटेल मेजबान आहे या प्रशस्त व नामांकित हाॅटेलात याकूब सेठ व इतर तिघांची भागीदारी असल्याचे माहिती असून या हाॅटेलचे सांडपाणी व मल निस्सारणासाठी हाॅटेल मालकांनी देगलूर-हैद्राबाद मुख्य रस्त्यावर अनाधिकृत खोदकाम करून वर्षभरापूर्वी पाईप लाईन टाकली आहे.परंतु पाईप लाईनचा खड्डा पूर्ववत दुरूस्ती न केल्यामुळे मोठी वाहतूक वर्दळ असलेल्या रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत.

याबाबत अनेक लोकांच्या मौखिक तक्रारी होत्या परंतु संबंधित हाॅटेलचे भागीदार हे वलयांकित व्यक्तित्व असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यास कुणीच तयार नव्हते. शेवटी या भागातील व्यावसायिक तथा दै.सत्य मराठीचे संपादक अयुबखान पठाण यांनी अनाधिकृत खोदकाम केल्याची तक्रार दि.3/6/2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करून प्रत ग्रामीण पोलीस व महामार्ग पोलीस ठाण्यात दिली होती.वास्तविक पाहता त्या तक्रारीवर संबंधित विभाग व महामार्ग पोलीसांकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना ती तक्रार दप्तर जमा केली गेली.परंतु आज रोजी खुद संपादक अयुबखान पठाण हेच या अनधिकृत खड्ड्यात अपघाताने जखमी झाल्यामुळे संतापून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मागील तक्रारीचा संदर्भ व घटनास्थळाचा पंचनामा करून लोकांच्या जीवितास इजा व शासकीय संपत्तीस हानी पोहोचण्यास कारणीभूत ठरवून हाॅटेल मालक याकूब सेठ व इतरांविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम 125 अ तसेच सार्वजनिक संपत्ती प्रतिबंधक कायदा 1984 कलम 3 नुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दाखल गुन्ह्याचा तपास हे.काॅ.जाधव यांच्याकडे देण्यात आला असून अद्याप मुख्य रस्त्यावर अनाधिकृत खोदकाम करणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी सदर रस्ता ज्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आहे; त्या कसूरवार अभियंत्यास अभय का देण्यात आला याबाबत जनतेत चर्चा होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *