मराठवाडा

नांदेड-अर्धापूर रोड चोरंबा टोल नाक्याजवळ चार चाकी वाहनाचा भीषण अपघात.

 

दिनांक 10 मार्च 2025 रात्री दीड वाजता हा अपघात घडल्याची माहिती आहे. गाडी अमरावती वरुन नांदेड ला परत येताना चोरंबा टोल नाक्याजवळ रात्री दीड वाजता बँक ऑफ बडोदा चे तरोडा नाका, सिडको शाखेचे व्यवस्थापक यांच्या टाटा कार चा अपघात झाला,
सुदैवाने दोन जण सुखरुप बचावले व एकाला गंभीर दुखापत झाली आहे व सध्या ते नांदेड च्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

रात्रीच्या प्रवासाचे कारण सूत्रांकडून असे कळाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा तुघलकी फर्मान काढण्यात आलेला आहे की रात्री मिटिंग संपल्यावर कुणीही अमरावतीत थांबायचे नाही, व रात्री 9 नंतरच वापसीचा प्रवास करावा व दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत हजर रहावे असे अनिवार्य करण्यात आले होते म्हणून ते रात्रीचा प्रवास करण्यात आला. बँकेच्या अधिकारी संघटनेकडून असे अमानुष फर्मान काढणाऱ्या विरुध सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करावी अशी विभागीय कार्यालया कडे मागणी करण्यात आली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *