शहर

सत्ताधाऱ्यांच्या बॅनरला रस्ता दिशादर्शकांचा आधार

महानगरपालिकेचे तोंडावर बोट डोळ्यावर हात

नांदेड दि. 13 नांदेड शहरात महानगरपालिकेतर्फे अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचा वेळोवेळी आव आणला जातो. पण हे बॅनर जेव्हा सत्ताधारी पक्षाचे असतात तेव्हा मात्र महानगरपालिका प्रशासन मुग गिळून गप्प बसण्याचे धोरण स्वीकारते. महानगरपालिकेला सत्ताधारीचे अनधिकृत बॅनर हे दिसत नाहीत आणि त्या विरोधात त्यांच्या तोंडातून ब्र सुद्धा निघत नाही यालाच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नांदेड शहरातील अनेक रस्ता मार्गदर्शकावर बिन दिक्कतपणे सत्ताधारी पक्षाचे बॅनर लावलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे कोणता रस्ता कुणीकडे जातो आणि नांदेड शहरापासून इतर शहरांचे अंतर किती आहे हे सर्व सामान्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. कारण या रस्ता दिशादर्शकावर रस्त्याचे अंतर लिहिलेले आहे त्यावर सत्ताधारी पक्षाचे बॅनर हे डौलाने उभे केलेले आहेत.

आता महानगरपालिका यावर आवर घालते की नेहमीसारखे सत्ताधारी पक्षापुढे शेपूट घालून बसते, हे पाहणे रंजक ठरणार आहे वेळोवेळी सामान्य नागरिकांच्या बॅनरवर महानगरपालिका कारवाही करून मोठा तीर मारल्यासारखा आणत असते पण ज्यावेळी राजकीय पक्ष किंवा बडे नेते यांच्या बॅनरवर कारवाही करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र मनपाची भूमिका ही दुटप्पी असल्याचे वारंवार दिसून येते आता तर चक्क सत्ताधारी पक्ष हे रस्त्यावरील दिशादर्शकांचा बॅनर लावण्यासाठी सर्रासपणे वापर करताना दिसून येत आहेत व त्यांना महानगरपालिका प्रशासन देखील अभय देत आहे या मागचे अर्थकारण सर्वसामान्याला उमगत नाही.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *