वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे आयुष्यभर साठवून ठेवणाऱ्या आठवणी…. पांडुरंगरावजी पावडे

अर्धापूर :- उध्दव सरोदे / राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड जिल्हा नांदेड येथे दिनांक 10 मार्च 2025 ते 12 मार्च 2025 या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. समारोप आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य माननीय पांडुरंगरावजी पावडे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना माननीय पांडुरंगरावजी पावडे म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे आनंद, उत्साह, समर्पन, जिंकण्याची जिद्द, पराभव स्वीकारण्याची क्षमता निर्माण करण्याचा मार्ग आणि आयुष्यभर जपून ठेवण्याच्या आठवणी होय.
तर विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवावे आणि भारतीय विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन मुदखेड तहसीलचे नायब तहसीलदार स्वप्निल जगताप यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना केले. विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आवश्यक असतात. असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए टी शिंदे यांनी केले.
स्नेह संमेलनामध्ये बॅडमिंटन, बुद्धिबळ, संगीत खुर्ची, हॉलीबॉल थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक अशा विविध 22 क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. तसेच पोस्टर प्रेसेंटेशन, पीपीटी प्रेझेंटेशन या अभिनव स्पर्धांसोबतच वाङ्मयीन स्पर्धांमध्ये वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, काव्यवाचन, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा अशा विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमात गुणवत्ता संपादित करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमा पूजनाने केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दत्ताजी मेहत्रे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागातील प्रा. डॉ. मारोती देशमुख, आभार क्रीडा संचालक डॉ. अर्जुनसिंह ठाकूर यांनी मानले. वार्षिक संमेलन यशस्वी करण्यासाठी डॉ. विजयसिंह ठाकूर, प्रा. प्रकाश कोथळे, डॉ. उत्तम जायभाये, डॉ. आर एस कोंडेकर, प्रा. सदाशिव भुयारे, डॉ. आर पी धावारे, डॉ. माधव बसवंते, डॉ. सतीश उमाटे,प्रा. डॉ. मयूर दरबेसवार, प्रा. डॉ. मोकले श्याम, प्रा. डॉ. आर. बी. कोटलवार, डॉ. संदीप कोरडे, प्रा. सुलोचना माळवे, प्रा. सुनील कदम, प्रा. ऋषिकेश मुंगल, प्रा. नंदा करंजकर, प्रा.ज्योती मुंगल, प्रा. बालाजी जाधव, श्री अंकुश डोंगरे, डि.के. डहाळे, इंगोले डी.सी., जयवंत पांचाळ, श्री डांगे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.



